#नाशिक : लेखानगर परिसरात कुल्फी खाल्ल्यानं 20 जणांना विषबाधा, 10 लहान मुलांचा समावेश ----------------------------------------- #FrenchOpenFinal : नोवाक जोकोविचला पहिल्यांदाच फ्रेंच ओपनचं जेतेपद, अँडी मरेवर 4 सेट्समध्ये मात ----------------------------------------- हिंगोली शहरात अर्ध्या तासापासून वादळी वाऱ्यासह पाऊस, बीएसएनएलचा टॉवर पडला, शहरातील वीजपुरवठा खंडीत ----------------------------------------- मुंबई-अहमदाबाद हायवेवर लक्झरी बस उलटून अपघात, 10 जण जखमी   मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुसरा अपघात, दोन स्विफ्टची एकमेकांना धडक   पुण्यात विठ्ठलनगर परिसरात रात्रभरात गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड, वारजे माळवाडीजवळील घटनेने भीतीचं वातावरण   हेडलाईन्स 1. रायगडमधील शेडूंगजवळ बस आणि कारचा भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू तर 25 जण जखमी ----------------- 2. मुंबई आणि किनारपट्टीवर वाढत्या तापमानामुळे जीवाची काहिली, मान्सूनचे ढग केरळमध्ये दाखल, राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान -------------- 3. पंधरा दिवसांच्या राजकीय नाट्याला पूर्णविराम, एकनाथ खडसेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला, निवृत्त न्यायाधीशांकडून आरोपांची चौकशी ------------------- 4. निराधार आरोप करुन पक्षाला बदनाम करण्याचा डाव, राजीनाम्यानंतर खडसेंचा काँग्रेस आणि दमानियांवर हल्लाबोल, पुराव्यासकट बोलण्याचं आव्हान ----------- 5. मथुरेच्या हिंसाचारात आंदोलकांचा प्रमुख रामवृक्ष यादवचा मृत्यू, उत्तर प्रदेश पोलिसांची माहिती, अमित शाहांकडून मंत्री शिवपाल यादवांच्या राजीनाम्याची मागणी ---------------------- 6. पाच देशांच्या दौऱ्यावरील मोदींचं कतारमध्ये जंगी स्वागत, कतारमधल्या भारतीयांसह उद्योजकांसोबतही मोदींची चर्चा ---------------------- 7. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं वृद्धपकाळानं निधन, मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास, मुंबईत आज अंत्यसंस्कार -------------- 8. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी संदीप पाटील उत्सुक, निवड समितीची टर्म संपल्यानंतर सूत्र स्वीकारण्यास तयार -------- 9. 22 वर्षीय मुगुरुझाला फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीचं विजेतेपद, अंतिम फेरीत वर्ल्ड नंबर वन सेरेना विल्यम्सवर 7-5, 6-4 ने मात