उस्मानाबाद, तेर, जागजी, वाघोली परिसरात मुसळधार पाऊस, लातूरमधील मुरुडमध्येही पावसाची हजेरी, सोलापुरातही वरुणराजाचं आगमन

--------------------------

कोल्हापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, दहा जणांना चावा, जखमींमध्ये लहान मुलाचाही समावेश

--------------------------

1. शेतकऱ्यांसाठी काम करु द्या, अज्ञातस्थळी असलेल्या खडसेंचं माध्यमांना निवेदन, आरोप नियोजित कटाचा भाग असल्याचाही दावा

-------------------------

2. मुंबई-ठाणे मेट्रोला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी, 32 किलोमीटरचा प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण होणार, ठाणेकरांना मोठा दिलासा

-------------------

3.  महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची मान्यता तात्पुरती स्थगित, कृषी अनुसंधान संस्थेची कारवाई, सुविधा आणि प्राध्यापकांच्या कमतरतेचा फटका

--------------------

4. उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट, घरांचं मोठं नुकसान, लातूर, बेळगावातही पावसाच्या सरी

---------------

5. शेतकरी असल्याचं पटवा आणि 1 रुपयांत जेवण मिऴवा, सोलापूर बाजार समितीची अनोखी योजना, पहिल्याच दिवशी 600 शेतकऱ्यांनी घेतला जेवणाचा आस्वाद

-----------------

6. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची आंध्र प्रदेशमधून राज्यसभेसाठी बिनविरोध निवड, तर बिहारमधून शरद यादव, राम जेठमलानी यांनाही राज्यसभेत एन्ट्री

-------------------------

7. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर, अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोचा दौरा करणार, ओबामांचीही घेणार भेट

---------------

8. कोल्हापूरकरांना चोरट्यांची भीती, गेल्या 15 दिवसांत तब्बल 17 घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या टोळीचा शोध सुरु, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

---------------

9. मथुरा हिंसाचारात पोलीस अधीक्षकांसह 24 जणांचा मृत्यू, ड्रीमगर्ल शूटिंगमध्ये व्यस्त, सर्व स्तरावरील टीकेनंतर घटना छोटी असल्याचं हेमा यांचं वक्तव्य

---------------

10. भारताच्या लिअँडर पेसला मार्टिना हिंगिसच्या साथीनं फ्रेन्च ओपनच्या मिश्र दुहेरीचं विजेतेपद, सानिया-डॉडिगवर टायब्रेकरमध्ये मात