Aaditya Thackeray SIT news Live: दिशा सालिअन प्रकरणात सगळं सुडाचं राजकारण, चौकशीत काहीच मिळणार नाही : सुनिल प्रभू
Aaditya Thackeray Disha Salian case Live : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सॅलियनप्रकरणी एसआयटी चौकशी करणार असून अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Dec 2023 11:30 AM
पार्श्वभूमी
Aaditya Thackeray Disha Salian case Live : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या (Aaditya Thackeray) अडचणीत वाढ होणार आहे. कारण दिशा सालियान (Disha Salian) आत्महत्या प्रकरणात...More
Aaditya Thackeray Disha Salian case Live : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या (Aaditya Thackeray) अडचणीत वाढ होणार आहे. कारण दिशा सालियान (Disha Salian) आत्महत्या प्रकरणात राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार आदित्य ठाकरेंची SIT चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे SIT पथक काम करणार आहे. दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते.दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी होते कुठे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Bharat Gogawale on Disha Salian case: दूध का दूध पाणी का पाणी होईल : भरत गोगावले
जर चूक असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. चुकी नसेल तर घाबरण्याचं काम नाही, असं म्हणते शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंच्या एसआयटी चौकशीवर भाष्य केलं. सुनील प्रभू आता अवसान आणल्या सारखे बोलतोय. विरोधकांकडे राहिले काय आहे त्यांनी आता जय महाराष्ट्र करावा..तीन राज्यात काय झालं आपण पाहिले आहे, असं भरत गोगावले म्हणाले.