Aaditya Thackeray: युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारवर कडाडून हल्ला चढवला. सरकार पडल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवेत हे लोकांचं म्हणणं असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. जनतेची कामं गद्दार सरकारने ठप्प करून ठेवली, पन्नास खोके नॉट ओके आता करायचं, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.
जी जनतेची काम आहे ती गद्दार सरकारने ठप्प करून ठेवली आहेत. Sewage treatmet plant हे काम आपण केलं होतं, पण त्याचं उद्घाटन मोदी साहेबांनी येऊन केलं. पण काम हे आपलं होतं. घनकचरा व्यवस्थापनच काम आपण करायला सुरवात केली. पर्यटन मंत्री म्हणून महाराष्ट्रात मी निधी दिला होता तो निधी ठप्प केला आहे. कोस्टल रोडच काम आपण पाहिलं होतं. उद्धव साहेबांनी पाठपुरावा केला होता, दर आठवड्याला बैठक आणि महिन्याला व्हिजिट करत होतो. शिवडी न्हावा लिंक रोड आपण काम करत होतो. दोन्ही विकास कामांची सुरवात आपण केली होती आणि उद्घाटन देखील आपणच करू हे मी ठाम सांगतो, असेही आदित्य म्हणाले.
मुंबईमधील विकासकामांवरून आदित्य यांच्याकडून चॅलेंज
आदित्य यांनी मुंबईमधील विकासकामांवरूनही शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली. त्यांनी सांगतले की," महिला अधिक नगरसेवक झाल्यात याचा अभिमान आहे. आज मी चॅलेंज देतो. मी जे प्रेझेंटेशन देतोय जे आम्ही मुंबईत काम केलं आहे. असंच प्रेझेंटेशन शिंदे गटाने द्यावे,त्यांनी मुंबईत काय काम केलं मुंबईत? जे काम झालं आहे ते देशात कुठेही झालं नाही. जर झालं असेल तर मी काही करायला तयार आहे. ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "उद्या वर्धापन दिन असताना आजच ट्विट करून शुभेच्छा दिल्या. दिल्लीवरून सांगितलं असेल. जाहिरातीनंतर खूप धसका घेतला आहे. परवाचा दिवस खूप महत्वाचा असून जागतिक खोके दिन आहे. 33 देशांनी त्याची नोंद घेतली आहे.
मुंबई महापालिका मुख्यमंत्र्यांच्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरची झाली आहे, प्रशासक हे मुख्यमंत्री यांचा किंवा बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचा फोन आला की हो हो करून काम देतात. पन्नास खोके नॉट ओके आता करायचं आहे, आता भ्रष्टाचार समोर आणायचे आहेत. आपल्या शहराची हे वाट तर लावत नाहीत ना? आता हे विषय समोर आणायचे आहेत लोकांसमोर ठेवायचे आहे, आता ही धोक्याची घंटा आहे.
रस्ते घोटाळा 6 हजार कोटींचा
ते पुढे म्हणाले की, 50 रस्ते पूर्ण करू म्हणाले होते एकही रस्ता पूर्ण झाला नाही. मी हे एक्झपोज करणार आहे. खडी घोटाळा मोठा झाला आहे. मुख्यमंत्र्यांची लोक यामध्ये आहेत. खडीही आमच्या मार्फत पाठवायची असं या खडी पुरवठादारांनी सांगितलं आहे. 5 कोटी हप्त्याला फायदा होता आता माहीत नाही. स्ट्रीट फर्निचर घोटाळा 263 कोटी घोटाळा झाला आहे. याच कॉन्ट्रॅक्ट मुंबई महापालिकाच्या आरोग्य विभागाकडून काढलं आहे. जे काम 125 कोटीमध्ये होणार होतं ते 263 कोटीमध्ये होत आहे. या संदर्भात आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहोत. हे घोटाळे करणाऱ्याला जेलमध्ये जावंच लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
बाजूचा फॉरेनर बोलला एकदम ओके
आदित्य यांनी परदेश दौऱ्यावर मित्राच्या वक्तव्याचा संदर्भ देत खोक्यांचा उल्लेख केला. "परवा लंडन मध्ये मित्र भेटला. 20 तारखेला मी बोललो खोके दिन आहे, तर बाजूचा फॉरेनर बोलला एकदम ओके. आज जागतिक फादर डे आहे. या राज्यात असे लोक आहेत जे दुसऱ्यांच्या वडिलांना चोरण्याचा प्रयत्न करत आहेत."
पण मला ट्रोलिंग आवडतं
आदित्य यांनी पेंग्विनवरून होणाऱ्या ट्रोलिंगवरून प्रत्युत्तर दिले. मला पेंग्विन पेंग्विन ट्रोल केलं जातं. पण तसं पेंग्विन सारखा चालतं कोण? हे मला माहित नाही, पण मला ट्रोलिंग आवडत. वाघ सुद्धा पाहायला एक तर मातोश्रीवर लोक येतात, नाहीतर झू ला मुंबईमध्ये येतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शिक्षण प्रणालीवरून म्हणाले की, शिक्षणाची पातळी बदलायची असेल तर कॉमन क्वालिटी शिक्षण आपण आणलं पाहिजे. टॅब शिक्षण आपण आणले पाहिजे. आम्ही दप्तराचे ओझं कमी केलं, 40 हजार विद्यार्थ्यांना आपण टॅब दिले, त्यावर ते शिकले. जागतिक ट्रेंड आपण आणले, आयसीएसई सीबीएसई सुरू केलं, सगळे बोर्ड सुरू केले.