26/11 हल्ल्यातील शहिदांना देशभरातून आदरांजली
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2016 12:04 AM (IST)
मुंबई: मुंबईकरांच्या मनावर कधीही न भरणारी जखम करणाऱ्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज 8 वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबईतल्या मरिन लाईन्स इथल्या पोलीस जिमखाना येथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी शहिदांना मानवंदना दिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते. 8 वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबरच्या काळरात्री अजमल कसाबसह 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात 166 जणांना प्राण गमवावे लागले तर 300हून अधिक जण जखमी झाले.