मुंबई लोकल खोळंब्याची रेल्वेमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
एबीपी माझा वेब टीम | 22 Jun 2016 11:44 AM (IST)
मुंबई : मुंबईतील कालच्या लोकल खोळंब्यामुळे रेल्वेप्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मनस्तापाची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. https://twitter.com/sureshpprabhu/status/745567698189430784 रेल्वेच्या केंद्रीय समीतीची टीम पाहाणीसाठी मुंबईत पाठवणार रेल्वेच्या केंद्रीय समितीची टीम लोकलची परिस्थिती पाहाणीसाठी मुंबईत येणार असल्याची माहिती सुरेश प्रभूंनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन दिली आहे. मुंबईकरांना लोकलचा त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ असंही सुरेश प्रभूंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. https://twitter.com/sureshpprabhu/status/745569725288169472 रेल्वेमंत्र्यांनी राजनीमा द्यावा, राष्ट्रवादीची मागणी दरम्यान, कालच्या लोकल खोळंब्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी सीएसटी स्थानकाजवळल आंदोलन केलं. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.