नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ-जुईनगर स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 11.30 वा. 19 वर्षीय ऋतुजा बोडके या तरुणीला लुटून लोकलमधून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
काल रात्री नेरुळ-जुईनगर दरम्यान ऋतुजा महिला डब्यातून प्रवास करत एक व्यक्ती थेट त्या डब्यात घुसला. यावेळी त्या व्यक्तीनं ऋतुजाकडील वस्तू हिसकावून घेण्याचा प्रयत्नही केला. यावेळी विरोध करणाऱ्या ऋतूजाला आरोपीने ट्रेनमधून खाली ढकलून तिचा मोबाईल, पर्स आणि कानातील रिंगावर डल्ला मारला. यावेळी ट्रेन जुईनगर रेल्वे स्थानकात प्रवेश करत होती. यावेळी ट्रेनचा वेग कमी झाल्यानं खाली पडलेल्या ऋतूजाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र तिच्या डोक्याला मार लागला असून सध्या तिला वाशीच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, आरोपी सी-वूड स्थानकापासून सदर तरुणीचा पाठलाग करत होता, अशी माहिती समोर येत आहे. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल केला असून नेरुळ, जुईनगर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध घेणं सुरु आहे.
मोबाईल, पर्स चोरुन नवी मुंबईत 19 वर्षीय तरुणीला लोकलमधून फेकलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Dec 2017 09:21 AM (IST)
नवी मुंबईतील नेरुळ-जुईनगर स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 11.30 वा. 19 वर्षीय ऋतूजा बोडके या तरुणीला लुटून लोकलमधून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -