मुंबई : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला आज 9 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. नऊ वर्षानंतर या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा भरल्या आहेत.


या हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या मनावरील आघात अद्याप कायम आहे. हल्ला झालेल्या बहुतेक ठिकाणांवर आज मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मधून हल्लाविषयी बोलण्याची शक्यता आहे.

या हल्ल्यात शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. कारण शहरात सीसीटीव्हीचं जाळं उभारण्यात येत असलं तरीही सुरक्षेच्या दृष्टीने आणखी प्रयत्न गरजेचे आहेत.

दरम्यान जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारावरील जकात नाके बंद झाले आहेत. त्यामुळे शहरात कोणतंही वाहन अगदी सहज आणि विना तपासणी प्रवेश करु शकतं. एबीपी माझाने याची पडताळणीही केली होती. अगदी कोणतंही वाहन मुंबईत सहजपणे प्रवेश करु शकतं, याबाबत एबीपी माझाने रिपोर्ट दाखवला होता.

संबंधित बातमी : 26/11 हल्ला अन् विश्वास नांगरे-पाटील