मुंबई: शाळेत जाताना इमारतीतून लोखंडी तवा डोक्यावर पडल्यानं एक विद्यार्थीनी जखमी झाल्याची घटना मुंबईत घडली. नागपाडाच्या मदनपुरा भागात काल ही घटना घडली. यात हाजिका कपाडीया ही 9 वर्षीय विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नायर रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार सुरु आहेत.

हाजिका काल नेहमीप्रमाणे शाळेत जात होती. त्याचवेळी 20 मजली इमारतीतून एक लोखंडी तवा हाजिकाच्या डोक्यावर पडला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच हा तवा कुणाच्या घरातून खाली पडला? याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.