मुंबईत कार-ट्रकचा भीषण अपघात, 9 जण गंभीर
वेदांत नेब, एबीपी माझा | 30 Apr 2017 08:00 AM (IST)
मुंबई : मुंबईत मध्यरात्री दादर-माटुंगा फ्लायओव्हरवर स्कॉर्पिओ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती मिळते आहे.