भिवंडी : भिवंडीतील आंबेशिवपाडा येथील एका बंगल्याच्या बाथरुममधून तब्बल 8 फुटी साप काल (गुरुवार) पकडण्यात आला आहे. आंबेशिव येथील विशाल कारभारी यांच्या बंगल्यातील बाथरुममध्ये धामण जातीचा साप आढळला.
घराच्या परिसरात साप असल्याचं समजताच कारभारी यांच्या कुटुंबातील सर्वांनीच घराबाहेर धूम ठोकली. या भागात मोठ्या प्रमाणात भात शेती आहे. त्यामुळे अनेकदा इथं साप आढळून येतात. पण प्रचंड मोठा साप दिसल्यानं येथील नागरिकांची भंबेरीच उडाली.
दरम्यान, याबाबतची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांना देण्यात आली. ही माहिती मिळताच बोंबे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मोठ्या शिताफीनं या सापला पकडलं. बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा साप धामण जातीचा असून तो बिनविषारी आहे. तसेच त्याची लांबी 8 फूट आहे. वन अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर बोंबे यांनी हा साप पुन्हा जंगलात सोडून दिला.
बाथरुममध्ये 8 फूट लांबीचा साप, सर्पमित्राच्या मदतीनं सापाची सुटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Dec 2017 08:56 PM (IST)
भिवंडीतील आंबेशिवपाडा येथील एका बंगल्याच्या बाथरुममधून तब्बल 8 फुटी साप काल (गुरुवार) पकडण्यात आला आहे. आंबेशिव येथील विशाल कारभारी यांच्या बंगल्यातील बाथरुममध्ये धामण जातीचा साप आढळला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -