भिवंडी : भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून अकरा जणांची सुखरुप सुटका करण्यात आलं. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. रविवारी (20 सप्टेंबर)रात्रीच्या सुमारास ही घटना घडली


शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड इथली ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



सुमारे तीस वर्षे जुनी जीलानी बिल्डिंग धोकादायक म्हणून महानगरपालिकेने घोषित करुन या इमारतीस दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती. दुर्घटनेत इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे गाडले गेले आहेत. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.





आतापर्यंत ढिगाऱ्या खालून 21 जणांना बाहेर काढलं असून त्यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत अकरा जणांची सुखरुप सुटका केली आहे. जखमींना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुलं आहेत.


सुखरुप सुटका केलेल्यांची नावं


1) हैदर सलमानी (पु/20वर्ष)
2) रुकसार खुरेशी (स्त्री/26 वर्ष)
3) मोहम्मद अली (पु/60 वर्ष)
4) शबीर खुरेशी (पु/30 वर्ष)
5) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/45 वर्ष)
6) कैसर सिराज शेख (स्त्री/27 वर्ष)
7) रुकसार जुबेर शेख (स्त्री/ 25वर्ष)
8) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/18 वर्ष)
9) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/22 वर्ष)
10) जुलेखा अली शेख (स्त्री/52 वर्ष)
11) उमेद जुबेर कुरेशी (पु/4 वर्ष)

मृतांची नावं

1) झुबेर खुरेशी (पु/30 वर्ष)
2) फायजा खुरेशी (पु/5वर्ष)
3) आयशा खुरेशी (स्री/७वर्ष)
4) बब्बू (पु/27वर्ष)
5) फातमा जुबेर बबु (स्त्री/2 वर्ष)
6) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/8वर्ष)
7) उजेब जुबेर (पु/6 वर्ष)
8) असका आबिद अन्सारी (पु/14 वर्ष)
9) अन्सारी दानिश अलिद (पु/12 वर्ष)
10) सिराज अहमद शेख (पु/28 वर्ष)