मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. एकाच दिवशी कोरोना बाधित असलेल्या 150 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 722 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. पैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक 441 असून 281 महिला आहेत. त्यामध्ये 31 ते 50 या वयोगटातील 318 रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल 21 ते 30 वयोगटातील 160 रुग्ण बरे झाले आहेत. तर 98 रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत. लक्षणीय बाब अशी की 91 ते 100 वयोगटातील एका रुग्णाने कोरोनाला हरविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा पाच हजाराच्यावर गेला आहे. त्यामुळे सर्व चिंतेत असताना बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.


राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची 374 एवढी आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात 120 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. 23 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात 722 रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे 26 रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 5218 जण पॉझिटिव्ह आले आहेत.


Coronavirus | नवी मुंबईत एकाच आयटी कंपनीतील 19 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह


कोरोना रुग्ण बरे होण्याचा वयोगट
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणता 31 ते 60 वयोगटातील 418 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना मुक्त 722 रुग्णांचा वयोगट आणि कंसात बरे झालेल्यांची संख्या: शून्य ते 10 (19); 11 ते 20 (59); 21 ते 30 (160); 31 ते 40 (164); 41 ते 50 (154); 51 ते 60 (98); 61 ते 70 (45); 71 ते 80 (15); 81 ते 90 (7); 91 ते 100 (1).


वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांची शिक्षा; केंद्र सरकारचा अध्यादेश


घरी सोडण्यात आलेल्या 722 रुग्णांची जिल्हा-मनपा निहाय संख्या
अहमदनगर मनपा- 5, अहमदनगर ग्रामीण-11, औरंगाबाद मनपा- 14, बुलढाणा- 8, गोंदीया, हिंगोली, जळगाव मनपा प्रत्येकी 1, कल्याण-डोंबिवली मनपा- 31, कोल्हापूर मनपा-2, लातूर ग्रामीण-8, मीरा भाईंदर मनपा- 5, मुंबई मनपा- 374, नागपूर मनपा- 12, नाशिक मनपा व ग्रामीण प्रत्येकी 1, नवी मुंबई मनपा- 19, उस्मानाबाद- 3, पालघर ग्रामीण-1, पनवेल मनपा- 13, पिंपरी-चिंचवड मनपा- 12, पुणे मनपा- 120, पुणे ग्रामीण- 5, रायगड ग्रामीण-3, रत्नागिरी-1, सांगली ग्रामीण- 26, सातारा- 3, सिंधुदूर्ग-1, ठाणे मनपा 16, ठाणे ग्रामीण- 4, उल्हासनगर मनपा- 1, वसई-विरार मनपा- 12, यवतमाळ-7


CORONA Parishad | कोरोनावर हॉमिओपॅथीकडे उपचार आहेत काय?