नवी मुंबई : कॅबींग संदर्भातील आयटी कंपनीमधील 19 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापे येथे कार्यरत असलेली बॅकींग क्षेत्राशी निगडीत ही आयटी कंपणी आहे. अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सरकारचे सर्व नियम आणि अटी पाळून ही कंपणी सुरू होती. बँकींग क्षेत्राचे बॅक ऑफीस म्हणून काम करणाऱ्या या कंपनीत 99 कामगार कामावर होते. एका शिफ्टमध्ये 30-32 असे तीन शिफ्टमध्ये येथे काम चालू होते. विशेष म्हणजे या सर्व कामगारांची कंपनीमध्येच राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. यात अत्यावश्यक सेवांना सहाय्य करणाऱ्या आयटी कंपन्या काही ठिकाणी सुरू आहेत. त्यातीलच एका कंपनीतील 19 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सरकारची चिंता वाढली आहे. या कंपणीत एकून 800 कामगार असले तरी सद्या कमी कामगारात काम सुरू ठेवण्यात आले होते. कंपनीने सर्व 99 कामगारांची कोरोना टेस्ट खासगी लॅबमध्ये केली असता यातील 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यानंतर तातडीने सर्वांना नवी मुंबई मनपा रुग्णालयात उपचारासाठी अॅडमिट केले असल्याचे मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राहिलेल्या कामगारांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. पॉझिटीव्ह आलेल्या 19 लोकांचा संपर्क गेल्या काही दिवसात कुणाशी आला आहे का याचा तपासणी महानगरपालिका वैद्यकीय विभाग करीत आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये 7 नवी मुंबई, 7 मुंबई , 2 ठाणे, 1 सांगली, 1 तेलंगणा, 1 आंध्र प्रदेश मधील राहणारे आहेत. बँकींग क्षेत्राशी निगडीत कंपनी असल्याने कंपनी सील करायची की पुर्ण सॅनिटाईझ करून परत चालू ठेवायची याचा निर्णय सरकारशी बोलून घेण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले आहे.


मुंबईकरांची चिंता वाढली
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांच्या वर पोहोचला आहे. यापैकी मुंबईतील सात वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असून 100 जास्त कोरोनाबाधित असलेले एकूण वॉर्ड 13 आहेत. मुंबईतील जी साऊथ प्रभागात (वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर) सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर त्यातल्या त्यात कमी म्हणजेच 20 रुग्ण आर नॉर्थ (दहिसरचा भाग) प्रभागात आहेत. तर, निम्म्यापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यातही मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3451 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत मृत्यू 151 जणांचा मृत्यू झाला आहे.


CORONA Parishad | कोरोना आयुर्वेदाने बरा होतो? आयुर्वेदाचार्य डॉ. विनिता देशमुख यांच्याशी बातचीत