मुंबई : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सरकारने यासंदर्भातील जीआर जारी केला आहे.


यापूर्वी महागाई भत्ता 125 टक्के इतका होता. तो आता 132 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2016 पासून लागू करण्यात आला असून 9 महिन्यांची थकबाकी रोख स्वरुपात मिळणार आहे.

दरम्यान राज्य सरकारचे तब्बल 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे.