वसई : पश्चिम रेल्वे मार्गावरील वैतरणा रेल्वे स्थानकात एका सात वर्षीय मुलाच्या बॅगमध्ये 6 लाख 48 हजार 640 रुपये सापडले आहेत. गुरुवारी (24 जानेवारी) रात्री पावणे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
वैतरणा रेल्वे स्थानक सूनसान असताना, पावणे नऊ वाजता सात वर्षांचा मुलगा पाठीवर बॅग अडकवून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वेची वाट पाहत उभा होता. त्याचवेळी वैतरणा इथले तुषार पाटील हे विरारला नाईट ड्यूटीसाठी जात होते. या मुलाचा संशय आल्याने त्यांनी त्याला आपल्यासोबत रेल्वेत बसवलं. त्याच्याशी बोलता बोलता बॅग तपासली असता, त्यात चक्क नोटांची बंडलं दिसली. नालासोपारा पूर्वमधील अन्सारीनगर इथे राहत असल्याचं मुलाने सांगितलं.
तुषार पाटील यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. वसई लोहमार्ग पोलिसांनी बॅगसह मुलाला ताब्यात घेतलं. पण हा मुलगा वैतरणा रेल्वे स्थानकात कसा आला, त्याच्याकडे एवढे पैसे कसे आले, हे पैसे कुणाचे होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
वैतरणा रेल्वे स्थानकात 7 वर्षीय मुलाच्या बॅगेत साडेसहा लाखांची रोकड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 10:31 AM (IST)
वैतरणा रेल्वे स्थानक सूनसान असताना, पावणे नऊ वाजता सात वर्षांचा मुलगा पाठीवर बॅग अडकवून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वेची वाट पाहत उभा होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -