मुंबई : मुंबईत लेप्टोस्पायरोसिस आजारामुळे सहावा बळी गेला आहे. भांडुप पूर्वेला राहणारा सिद्धेश माणगावकर या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सिद्धेश इंजिनिअर होता.
सिद्धेश माणगावकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. 13 जुलैला संध्याकाळी कामावरुन परतताना त्याला अधिक अस्वस्थ वाटू लागलं.
त्यामुळे आई-वडिलांनी सिद्धेशला तातडीने मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. सिद्धेशला फोर्टिस रुग्णालयात दाखल कारताना तो बेशुद्धावस्थेतच होता. आठ दिवस सिद्धेशला शुद्ध आली नव्हती, त्यामुळे तो औषधांनाही प्रतिसाद देत नव्हता.
फोर्टिस रुग्णालयात त्यावर उपचार सुरु असताना सिद्धेशचं फुफ्फुस, मूत्रपिंड आणि अन्य अवयव निकामी होत गेले. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सिद्धेशच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, त्यातून सिद्धेशला लेप्टोस्पायरोसिस झाल्याचे लक्षात आले.
अखेर शुक्रवारी सिद्धेश माणगावकरचा मृत्यू झाला.