नवी मुंबई: मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर पालकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केलं आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून ७ आरोपी अद्याप फरार आहेत.
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असं सांगत १७ पालकांना ३ कोटींचा गंडा घातल्याचं तपासात समोर आलं आहे. मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेटमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो अस सांगून या आरोपींनी पालकांकडून चेक,आरटीजीएस,एनईएफटी,डीडीच्या मध्यामातून पैसे उकळले.


नवी मुंबईतल्या सानपाडा रेल्वे स्थानकाच्या कॉम्प्लेक्समध्ये द इन्स्पिरेशन नावानं बनावट कार्यालय उघडून नीट परीक्षा पात्र विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क केला जात होता. या विद्यार्थ्यांना तेरणा किंवा मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळवून देतो असं सांगत पैसे उकळण्यात आले होते.
पैसे भरुनही प्रवेश न मिळाल्यानं पालकांनी पोलिसांत तक्रार केली आणि पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे.