वाशी : नवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्थानकावरून एका 3 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. हा अपहरणाचा प्रकार स्टेशनवरच्या सीसीटीव्हीत कैद झाला. अपहरणकर्ता मुलाला घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. स्टेशन परिसरात राहणारी महिला तिच्या 3 वर्षाच्या मुलासोबत वडापाव खरेदी करण्यासाठी आली होती. पैसे देताना आईने मुलाचा हात सोडला आणि तो हरवला. आईच्या तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं, तेव्हा एक अज्ञात व्यक्ती या मुलाला घेऊन जाताना दिसला. https://twitter.com/ANI/status/906391224944226305 हा व्यक्ती या मुलाला घेऊन 1 वाजून 3 मिनिटांनी पनवेल लोकलमध्ये चढला. आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत असून अपहरणावेळी आरोपी व्यक्तीने दारु पिल्याचंही दृश्यांमधून दिसत आहे. पाहा व्हिडिओ :