मुंबई : मुंबईच्या दादर चौपाटीवर 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी हा प्रकार घडला आहे. बुडालेली तीनही मुलं महापालिकेच्या शाळेत शिकणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दादर चौपाटीवर आज सकाळी फिरायला गेलेली तीन शाळकरी मुलं बुडाली. माहिम पश्चिमेला राहणारी तीनही मुलं महापालिकेच्या शाळेत शिकत होती. अनुपकुमार यादव(16), भरत हनुमंता(13) आणि रोहितकुमार यादव(15) अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. बुडालेल्या तीनही मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे. यात भाभा रुग्णालयात तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसात पाण्यात बुडून मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. सिंधुदूर्गच्या आंबोलीमध्येही कावळेसाद पॉईंटवरुन खाली कोसळ्यानं दोघांचा मृत्यू झाला होता, तर रायगडमध्ये 2 महिन्यात 9 अतिउत्साही पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.