वसई : नालासोपारा पश्चिमेकडील निलमोरे येथील आनंद व्ह्यू या इमारतीच्या सेफ्टी टँकची (टाकी) साफ-सफाई करण्यासाठी एक मजूर टँकमध्ये उतरला होता. सफाईचे काम सुरु केल्यानंतर काहीच वेळात तो टाकीत गुदमरुन बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आणखी दोन जण टाकीत उतरले. परंतु त्या तिघांनाही आतमध्ये गुदमरु लागल्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला आहे.


सहा मजूर निलमोरे येथील आनंद व्ह्यू या इमारतीमधील सेफ्टी टँक सफाईचे काम करत होते. रात्री 12.30 च्या सुमारास एक मजूर सेफ्टी टँकमध्ये मध्ये उतरला. तिथे त्याला अस्वस्थ वाटू लागले. तेवढ्यात तो आतमध्येचे बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी आणखी दोन जण टँकमध्ये उतरले. टाकीमध्येच गुदमरुन तीनही मजुरांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी रात्री अग्निशमन दलाच्या मदतीने तिघांचेही मृतदेह टाकीबाहेर काढून पंचनाम्यासाठी पाठवली आहे. याप्रकरणी इमारतीच्या सुपरवायझरला ताब्यात घेतले आहे.