उल्हासनगर (कल्याण): उल्हासनगरमध्ये तीन दिवसांच्या चिमुकलीला रस्त्यात टाकून आई पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक एकमध्ये ही चिमुकली आढळल्यानं एकच खळबळ उडाली. अंधाराचा फायदा घेत या चिमुकलीच्या आईनं तिला हातगाडीवर टाकून पळ काढला. स्थानिक लोकांनी चिमुकली दिसताच पोलिसांना याची माहिती दिली.
त्यानंतर या चिमुकलीला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या चिमुकलीची तब्येत चांगली असून, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.