उल्हासनगर: उल्हासनगरमधील मण्णपुरमच्या कार्यालवर दरोडा टाकून 7 कोटींचं सोनं लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी कमरुद्दीन शेखला त्याच्या दोन साथीदारांसह अटक केली आहे.
26 डिसेंबर रोजी आरोपींनी उल्हासनगरमधील मण्णपुरमचं कार्यालय फोडून 28 किलो सोनं पळवून नेलं होतं. त्यानंतर आरोपींनी आपआपसात सोनं वाटून देशातल्या विविध राज्यात पोबारा केला होता.
दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींना झारखंड, तुर्भे आणि दिवा इथून अटक केली. या तीन आरोपींकडून तब्बल 2 किलोहून अधिक सोनं जप्त केलं आहे. दुसरीकडे या टोळीतल्या इतर 15 जणांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत.