मुंबई : 27 सप्टेंबर या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्याच दिवशी म्हणजेच 27 सप्टेंबर 1883 रोजी समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले होते. तर आजच्याच दिवशी इतिहासात लॅरी पेज आणि सर्जी बेन यांनी गुगल सर्च इंजिनचा शोध लावला.तसेच भारतीय क्रांतिकारकांचे मेरूमणी भगतसिंह यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. 2020 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकांना मंजुरी दिली होती. 1996 मध्ये तालिबानने काबुलवर ताबा मिळवला होता.
1833 : राजा राममोहन रॉय यांचे निधन
थोर समाजसुधारक म्हणून राजा राममोहन रॉय (Raja Ram Mohan Roy) यांचं नाव आजही तितक्याच आदराने घेतलं जातं. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन आणि अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. राजा राममोहन राॅय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. दरम्यान त्यांनी अनेक रुढी आणि परंपरांना विरोध केला. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी 1828 रोजी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. स्त्री–पुरुष समानतेचे ते खंदे पुरस्कर्ते होते. समाजातील सुधारणांना चालना देण्यासाठी त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली. ब्रिटिशांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राजा ही पदवी दिली. राजा राम मोहन रॉय यांचं निधन 27 सप्टेंबर 1833 रोजी झालं.
1907 : भगतसिंह यांचा जन्मदिन
हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात भगतसिंह यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना अवघ्या 23 व्या फाशीची शिक्षा देण्यात आली. भगतसिंह यांचा (Bhagat Singh) जन्म 27 सप्टेंबर 1907 साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर परिणाम इतका परिणाम झाला की त्यांनी ब्रिटिशांना या देशातून बाहेर काढण्याची शपथ घेतली. भगतसिंह यांनी चंद्रशेखर आजाद यांच्या सोबत मिळून 9 सप्टेंबर 1925साली 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)'ची स्थापना केली. या संघटनेचे मुख्य उद्देश हा सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रजी सरकार उलथून लावणे हे होतं. 1927 साली भारतात आलेल्या सायमन कमिशनला विरोध करत असतांना इंग्रजांकडून झालेल्या लाठीचारात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. त्याचा बदला म्हणून भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी सॉंडर्सची हत्या घडवून आणली.
त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. डिसेंबर 1928 मध्ये भगतसिंह आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरु यांनी वयाच्या 21 व्या वर्षी ब्रिटीश अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या झाडल्या. खरंतर त्यांचा जेम्स स्कॉट यांना ठार मारण्याचा हेतू होता. पण चुकून दुसऱ्या अधिकाऱ्याला गोळी झाडली. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद आणि शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर भगतसिंहांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर भगतसिंह युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले. त्यानंतर ते ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचारांचे समर्थक झाले.
1980 : जागतिक पर्यटन दिन
२७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना 1970 मध्ये याच दिवशी झाली होती. पर्यटनाला चालना देणे हा जागतिक पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश आहे. याच माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यास देखील मदत होऊ शकते. त्यामुळे जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना राबवण्यात आली. पर्यटन व्यवसाय हा सध्याच्या काळातील उभरता व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण कऱण्यासाठी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो.
1996 : तालिबानचा काबुलवर कब्जा
27 सप्टेंबर 1996 रोजी मोहम्मद उमर याच्या नेतृत्वाखाली तालिबानने काबुलवर कब्जा मिळवला. त्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमधील लोकशाही सरकार उलथवलं आणि अफगाणिस्थानमध्ये सरकार स्थापन केलं. त्यानंतर 26/11 च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेन याला संपवण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि तालिबानचे सरकार उलथवून लावलं.
1998 : गुगल सर्च इंजिनची स्थापना
गूगल या सर्च इंजिनची स्थापना अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली. लॅरी पेज आणि सर्जी बेन यांनी आजच्याच दिवशी म्हणजे 27 सप्टेंबर 1998 रोजी गुगल या सर्च इंजिनची स्थापना केली होती. गूगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे.एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.इंटरनेटवरील कोणतीही माहिती गूगल शोधून देऊ शकतो. गूगल हा एक लोकप्रिय ॲप आहे आणि लोक त्याचा जास्तीत जास्त वापर करतात.
1933: दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म
चित्रपट निर्मिती कंपनी यशराज फिल्म्सचे संस्थापक आणि चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. 27 सप्टेंबर 1932 रोजी तत्कालीन पंजाब प्रातातील लाहोरमध्ये झाला. त्यांना सहा राष्ट्रीय चित्रपट आणि 8 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले . , भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले आणि 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. 2006 मध्ये, ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्सने त्यांना आजीवन सदस्यत्व दिले. तसेच हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले भारतीय आहेत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. त्यांनी 1959 मध्ये धूल का फूल , अवैधतेबद्दल एक मेलोड्रामा, आणि धर्मपुत्र (1961) या सामाजिक नाटकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं.
2020 : तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकांना मंजुरी दिली
मोदी सरकारच्या काळात वादग्रस्त ठरलेल्या तीन कृषी कायद्यांना 27 सप्टेंबर 2020 रोजी त्यावेळचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली. मोदी सरकारने कृषी कायद्यात सुधारणा करणारी तीन विधेयकं संसदेत मंजूर केली होती. या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तब्बल एका वर्षाहून जास्त काळ हे आंदोलन करण्यात आलं. शेवटी या आंदोलनाच्या दबावाखाली मोदी सरकारने ती वादग्रस्त विधेयकं मागे घेतली.
इतर महत्त्वाच्या घटना :
1821: मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
1825: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
1854: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.
1925: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.
1972: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन.
2004: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन