Mumbai Local Train: मुंबईची लाईफलाईन (Mumbai News) समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Train) पडून गेल्या वर्षभरात एकूण 2507 जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात मध्य (Central Railway) आणि पश्चिम मार्गासह (Western Railway) रेल्वेतून पडून 700 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

उर्वरित मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना खांबाला आदळल्यानं झाले असल्याचं समोर आलं आहे. अपघात होऊ नयेत, तसेच रेल्वे रुळ ओलांडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाढत्या रेल्वे अपघातांमागे प्रवाशांचा निष्काळजीपणा असल्याचं बोललं जात आहे. स्टेशन परिसरात किंवा ट्रेनच्या आत रेल्वेनं केलेल्या घोषणांकडे प्रवासी अनेकदा दुर्लक्ष करतात. तसेच, गर्दीच्या वेळी स्थानकावर गर्दी असते, त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडतात. 

रेल्वेनं जारी केलेली आकडेवारी (2022 मधील आकडेवारी) 

मध्य रेल्वे (Central Railway)

1. रुळ ओलांडताना 

महिला : 77पुरूष : 577

सर्वाधिक मृत्यू  (रुळ ओलांडताना)

ठाणे स्टेशन : 127कुर्ला स्टेशन : 101

2. ट्रेनमधून पडून 

महिला : 31पुरूष : 479

सर्वाधिक मृत्यू (ट्रेनमधून पडून )

कल्याण : 105ठाणे : 89

वेस्टर्न लाईन (Western Line) 

1. रुळ ओलांडताना 

महिला : 39पुरूष : 425

सर्वाधिक मृत्यू (रुळ ओलांडताना)

बोरीवली : 140वसई : 113

2. ट्रेनमधून पडून 

महिला : 21पुरूष : 169

सर्वाधिक मृत्यू (ट्रेनमधून पडून)

बोरीवली : 40वसई : 67

(याशिवाय इतरही अनेक कारणांमुळे मृत्यू)

6 डिसेंबर रोजी मुंबईतील माहीम परिसरात राहणारा 10 वर्षीय फरहान अन्सारी हा नमाज अदा करण्यासाठी माहीमहून वांद्र्याच्या दिशेनं त्याच्या 2-3 मित्रांसह गेला होता. दरम्यान, ट्रेनमध्ये प्रवास करत असताना फरहान अचानक ट्रेनमधून खाली पडला. या अपघातात फरहानला त्याचा एक पाय गमवावा लागला, मात्र वेळीच वांद्रे स्थानकावर उपस्थित असलेले जीआरपी पोलीस कॉन्स्टेबल चेतन तातू यांनी शौर्य दाखवत फरहानला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. सध्या फरहानवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.