मुंबई : 2008 च्या मालेगाव स्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या मेजर रमेश उपाध्यायला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
याआधी ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितची जामीनावर सुटका केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने मेजर रमेश उपाध्यायची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. परंतु जामीन मंजूर करताना हायकोर्टाने त्याच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आहे.
नाशिकमधील संवेदनशील परिसर असलेल्या मालेगावात 29 सप्टेंबर, 2008 रोजी नूरजी मशिदजवळ एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यात सात जणांचा मृत्यू झाला होता, 100 जखमी झाले आहेत.
या प्रकरणात एनआयए कोर्टाने 19 सप्टेंबर रोजी सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर द्विवेदी यांनाही जामीन मिळाला होता.
2008 मालेगाव स्फोट : मेजर रमेश उपाध्यायला जामीन
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
26 Sep 2017 03:01 PM (IST)
याआधी ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितची जामीनावर सुटका केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -