मुंबई : एलफिन्स्टनच्या पादचरी पुलावरच्या दुर्घटनेनं मुंबईला दिलेली जखमी कधीच भरून निघणारी नाही. या दुर्घटनेत कुणी आपली मुलगी गमावली, कुणी आई गमावली तर कुणी जवळचा मित्र गमावला.
कल्याण जवळच्या विठ्ठलवाडीमध्ये राहणाऱ्या वरपे कुटुंबियानं सर्वांच्या लाडक्या श्रद्धाला गमावलं आहे. पाच मिनिटांसाठी श्रद्धा आणि तिच्या वडिलांची चुकामूक झाली आणि होत्याचं नव्हतं झालं.
20 वर्षीय श्रद्धा परळमधल्या कामगार संघात आपल्या वडिलांसोबतच कामाला होती. आजही ती वडिलांसोबतच विठ्ठलवाडीहून परळला जाण्यासाठी निघाली. परळला पोहचल्यावर श्रद्धाच्या पायाला काही लागलं आणि ती ठेचकाळली. त्याचदरम्यान, तिची आणि वडिलांची चुकामूक झाली. त्यानंतर श्रद्धा जेव्हा पुढे आली तेव्हा एल्फिन्स्टन पुलावर प्रचंड गर्दी झाली होती आणि याच गर्दीनं 20 वर्षीय श्रद्धाचा हकनाक बळी घेतला.
बाबांच्या सोबतीनं कामाला जाणारी, घरकामात मदत करणऱ्या श्रद्धाच्या अकाली निधनानं तिच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.
नेमकी घटना काय?
मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत.
आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.
त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि चिरडून 22 जणांचा मृत्यू झाला.
मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे, तर जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. गरज पडल्यास जखमींना उपचारांसाठी इतरत्र हलवण्यात येईल, असंही मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
एल्फिन्स्टन दुर्घटना : ऑफिसच्या शेवटच्या दिवशी तेरेसा फर्नांडिस यांचा मृत्यू
दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत
एल्फिन्स्टन दुर्घटनेत ज्योतिबा चव्हाण यांचा मृत्यू
कुटुंबाचा एकमेव आधार हरपला, मयुरेशचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू
दहीहंडीला सलामी देणाऱ्या गोविंदाचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री
बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या!
एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?
एल्फिन्स्टन दुर्घटना : वडिलांशी चुकामूक श्रद्धाच्या जीवावर बेतली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2017 10:26 PM (IST)
20 वर्षीय श्रद्धा परळमधल्या कामगार संघात आपल्या वडिलांसोबतच कामाला होती. आजही ती वडिलांसोबतच विठ्ठलवाडीहून परळला जाण्यासाठी निघाली. परळला पोहचल्यावर श्रद्धाच्या पायाला काही लागलं आणि ती मध्येच अडखळली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -