भिवंडी : नवरा-बायकोमध्ये झालेला किरकोळ वाद दोघांच्या जीवाशी आला. नवरा बायकोच्या वादात बायकोने स्वतःला पेटवून घेतले. या आगीत भाजल्याने तिच्यासह तिच्या दोन वर्षाच्या चिमुरडीचाही मृत्यू झाला. या घटनेत पतीही गंभीर जखमी झाला आहे.
सस्मिता मलिक (28) आणि 2 वर्षाची चिमुरडी सुबोस्त्री मलिक अशी मृतक मायलेकींची नावं आहेत.
भिवंडी तालुक्यातील भाडवड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका चाळीच्या खोलीत असणारे मलिक कुटुंब राहते. नवरा-बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सस्मिता यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. ही आग बघता बघता संपूर्ण घराला लागली.
या आगीमुळे घरात आगीचा मोठा भडका उडाला. या आगीच्या भडक्यात सस्मितासह पती रतिकांत आणि 2 वर्षीय चिमुरडी सुबोस्त्री भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान पत्नी आणि दोन वर्ष सुबोस्त्री चिमुरडीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी आहे.
नवरा-बायकोमधील किरकोळ वाद मायलेकीच्या जीवाशी, आईसह दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Mar 2019 10:46 PM (IST)
भिवंडी तालुक्यातील भाडवड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका चाळीच्या खोलीत असणारे मलिक कुटुंब राहते. नवरा-बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सस्मिता यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. ही आग बघता बघता संपूर्ण घराला लागली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -