कल्याणमध्ये तब्बल चौदा घरफोड्या करणाऱ्या दोघांना बेड्या
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2017 05:06 PM (IST)
कल्याण: कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया करत अट्टल घरफोड्यासह जुन्या नोटा बाळगणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. दरोडोखोरांकडून १४ गुन्हे उघडकीस आले असून नोटा बदलून देणाऱ्यांकडून तब्बल २० लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत कल्याण आणि परिसरात घरफोड्यांचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन घरफोड्यांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एका वेगळ्या कारवाईत २० लाख २७ हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच यासंबंधी आयकर विभागालाही माहिती देण्यात आली आहे.