मुंबईत चांदिवलीमध्ये दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 18 Jan 2017 07:25 AM (IST)
मुंबई : मुंबईत चांदिवलीमध्ये दोन सख्या भावांचा बुडून मृत्यु झाला आहे. सद्दाम आणि अस्लम अब्दुल शेख अशी मृत भावांची नावं असून त्यांचा तिसरा भाऊ जावेद शेखला वाचवण्यात यश आलं आहे. काल रात्री ही घटना चांदिवली येथील मनु भाई खाणीमध्ये घडली. मानसिक त्रासात असल्यानं सद्दामनं पाण्यात उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी अस्लम आणि जावेद यांनी उडी मारली. या दोन्ही भावांनीही उडी मारली. यात अस्लम याचाही मृत्यू झाला आहे, तर जावेदला वाचवण्यात यश आलं. काल रात्री 9.30 च्या सुमारास हा प्रकार झाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. रात्री 12.30 वाजता दोन्ही मृतदेह शोधून अग्नीशमन दलानं आपलं शोधकार्य थांबवलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.