मिळालेल्या माहितीनूसार आरोपी देवेंद्र भोसलेने पीडित तरुणीला आपल्यासोबत फिरायला नेलं. यानंतर तिच्यावर बलात्कार करुन पाण्यात बुडवून तिची हत्याही केली. हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा मृतदेह तिच्याच सोसयटीजवळ आणून टाकला.
24 वर्षीय देवेंद्र भोसलेचं या 19 वर्षीय तरुणीवर प्रेम होतं. मात्र, मैत्रिणीला दुसऱ्यासोबत फिरताना बघितल्यानं त्याला राग आला. त्यानंतर आरोपीनं प्रेयसीला तुंगारेश्वर इथं नेलं आणि तिथंच तिची हत्या करुन नंतर मृतदेह तिच्या सोसायटीबाहेर टाकून दिला होता.
संबंधित बातम्या:
दुसऱ्या तरुणासोबत फिरताना पाहिल्यानं प्रेयसीची हत्या, प्रियकर अटकेत