मुंबई : शिवसेना आणि भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले 180 हून अधिक उमेदवार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादीने सुरुवातीला 3 याद्या जाहीर केल्या. त्यानंतर काल रात्री बाकीच्या उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्यात आले.
राष्ट्रवादीच्या वॉर्ड क्रमांक 205 मधून आज उमेश येवले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी लालबाग परिसरात मोठी गर्दी केली होती. मोठ्या कार्यकत्यांच्या उपस्थितीत उमेश येवले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबईत तशी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी आहे. पण काँग्रेस सोबतची आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादीने मुंबईत आपली ताकद पणाला लावली आहे. मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.