मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 किलो सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणाऱ्या एका दक्षिण कोरियाच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
किम युन्गजिन नावाचा हा इसम कॅथी पॅसिफिक फ्लाईट नंबर CX663 ने हाँगकाँवरुन मुंबईत येत होता. बॅग तपासल्यानंतर तो ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करत असताना, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याला थांबवलं.
यावेळी तपासणीदरम्यान त्याच्या पांढऱ्या जॅकेटमध्ये ही सोन्याची बिस्कीटं आढळली. त्यानंतर मुंबई कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याला बेड्या ठोकल्या.
या सोन्याची बाजारातील किंमत तब्बल 4 कोटी 15 लाख रुपये आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 10 ते 15 वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सध्या या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
मुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2018 10:24 AM (IST)
यावेळी तपासणीदरम्यान त्याच्या पांढऱ्या जॅकेटमध्ये ही सोन्याची बिस्कीटं आढळली. त्यानंतर मुंबई कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याला बेड्या ठोकल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -