मुंबई : दक्षिण मुंबईतून तब्बल 135 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. डीआरआयच्या पथकानं ही कारवाई केलीय. सोनं तस्करांवर करण्यात आलेली आतापर्यंतची ही मोठी कारवाई असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी आतापर्यंत 200 किलो सोन्याची तस्करी केल्याची कबुली दिली आहे.


डीआरआयच्या माहितीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. आरोपींनी आतापर्यंत 200 किलो सोन्याची तस्करी केल्याची कबुली दिली आहे.
बीडमध्ये साडे आठ लाख रूपयांची रोकड जप्त

दुसरीकडे बीडमध्ये वाहन तपासणी दरम्यान एका कारमध्ये तब्बल साडे आठ लाख रूपयांची रोकड आढळून आली आहे. ही रक्कम जप्त करून निवडणूक विभागाच्या आचारसंहिता पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही कारवाई बीडच्या वाहतूक शाखेने नगर रोडवर राजुरी फाट्यानजीक करण्यात आली आहे.

एक संशयास्पद कार (जीजे 03 एफडी 8807 ) भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी ही कार अडविली. तपासणी केली असता डिक्कीतील एका सुटकेसमध्ये रोख रक्कम असल्याचे दिसले.