मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सीलिंकवर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलसह सह जण गंभीर जखमी आहेत.
सीलिंकवर रात्री 12 च्या सुमारास सुमो कार भरधाव वेगाने वांद्र्याहून वरळीच्या दिशेने जात होती. मात्र चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पुढे असलेल्या i20 या कारला जोरदार धडक दिली. यानंतर i20 कार डिव्हायडरला धडकली.
सुमो कारमध्ये 7 जण प्रवास करत होते. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. i20 कारमधील 1 पुरुष आणि दोन महिला सुरक्षित आहेत.
पंचनामा करणाऱ्या पोलिसाला कारची धडक
अपघाताचा पंचनामा करण्यासाठी तिथे पोलिस आणि वाहतूक पोलिस पोहोचले. मात्र त्याचवेळी एका भरधाव कारने पोलिस कॉन्स्टेबलला धडक दिली. जखमी पोलिस कॉन्स्टेबलवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु आहे. कारचालकाला ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवलं. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.