मुंबई : मुंबईकरांच्या स्वप्नातलं घराची अर्थात म्हाडाची लॉटरी आज जाहीर होणार आहे. मुंबईत आज म्हाडाच्या 972 घरांची सोडत निघणार आहे. या सोडतीकडे मुंबईत स्वतःचं घर असावं, असं स्वप्न उराशी बाळगून अर्ज केलेल्या अर्जदारांचे डोळे लागले आहेत.

 

972 घरांसाठी तब्बल 1 लाख 35 हजार अर्ज म्हाडाकडे आले आहेत. वांद्रा पश्चिम इथल्या रंगशारदा हॉलमध्ये सकाळी 9 वाजता घरांची सोडत निघणार आहे.

 

बोरीवली, दहीसर, गोरेगाव, मालाड, मानखुर्द, चेंबूर, कुर्ला आणि पवई येथील घरांसाठी ही लॉटरी आहे. त्यामुळे सोडतीत कोणाचं नशीब चमकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

 

म्हाडांच्या घरांसाठी कलाकारांचे अर्ज

म्हाडाच्या घरासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'फेम तनुज महाशब्दे, 'बँडीट क्वीन' आणि 'वॉटर'फेम अभिनेत्री सीमा बिस्वास, 'ती फुलराणी'फेम अभिनेत्री हेमांगी कवी, 'राधा ही बावरी'फेम अभिनेत्री श्रुती मराठेने अर्ज भरला आहे. याशिवाय शैला काणेकर, मेघना एरंडे, रसिका आगाशे, अनुपमा ताकमोघे, प्राजक्ता हनमघर, किरण सुतावणे, तेज सप्रू, शार्दुल सराफ, गौरव घाटणेकर, मनिष वाधवा, तबलावादक आदित्य कल्याणपूर, किरण कुलकर्णी, प्रतिभा शिंपी यांनीही अर्ज दाखल केला आहे. या कलाकारांनी पवई, प्रतीक्षा नगर, गोरेगाव, जुने मागाठाणे इथल्या घरासाठी अर्ज केला आहे.

 

संबंधित बातम्या