India Pakistan War : पहलगाममधील दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाल्यानंतर भारताने ऑपरेशन 'सिंदूर'च्या (Operation Sindoor) माध्यमातून पाकिस्तानला (Pakistan) चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरुद्ध (India) आपल्या नापाक कारवाया करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, उधमपूर, अखनूर, जैसलमेर, जालंधर, फिरोजपूर आणि पोखरणसह अनेक भारतीय भागांना लक्ष्य करत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. पण भारतीय सैन्याने (Indian Army) पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडलाय. 

भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन JF-17 आणि एक F-16 लढाऊ विमान पाडले आहे. तसेच, पाकिस्तानी हवाई दलाचे AWACS विमान त्यांच्याच पंजाब प्रांतात नष्ट करण्यात आले. भारताने S-400 आणि L-70 हवाई संरक्षण प्रणाली वापरून 50 हून अधिक पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली आहेत. 

बाहेर एकामागे एक स्फोटांचे आवाज ऐकू आले, पण...

रात्री उशिरापासून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले पाहणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक भागातील सामान्य लोकांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. एका व्यक्तीने सांगितले की, 'काल रात्री, आम्ही जेवायला सुरुवात करताच, आम्हाला काही स्फोटांचे आवाज ऐकू आले. पहाटे ४:३० च्या सुमारास, पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकू आले. परंतु, ते देखील आमच्या सुरक्षा दलांनी निष्क्रिय केले. काळजी करण्यासारखे काहीही नाही. आपले सुरक्षा दल सतर्क आहेत. जर भगवती वैष्णोदेवी जम्मूमध्ये असेल तर घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांवर हल्ला करणे हा भ्याडपणा आहे. कारण त्यांच्याकडे (पाकिस्तानात) आपल्या सैन्याशी लढण्याचे धाडस नाही. ते एवढेच करू शकतात. आपले सैन्य योग्य उत्तर देत आहे. आम्हाला त्यांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

आम्हाला आपल्या देशाचा अभिमान 

दुसर्‍या व्यक्तीने म्हटले आहे की, काल रात्री पूर्णपणे वीज खंडित झाली होती. त्यानंतर ड्रोन उडू लागले आणि रात्रभर गोळीबार सुरू राहिला. आपले सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. आम्हाला आपल्या पंतप्रधानांवर आणि आपल्या सैन्यावर विश्वास आहे. आपल्या सैन्याने सर्व ड्रोन निष्क्रिय केले आहेत. आम्हाला आपल्या देशाचा अभिमान आहे. सीमेजवळ तणाव आहे. पण, इतर ठिकाणे सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील एका स्थानिकाने सांगितले की, 'आम्ही काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 3-4 ड्रोन पाहिले. रात्रभर प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू होता. पाकिस्तानने जे केले ते बरोबर नव्हते. आम्हाला भीती वाटत नाही. येथील शाळा बंद आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. 

आणखी वाचा 

India Pakistan War : ऑपरेशन सिंदूरनंतर रेल्वे हाय अलर्टवर, ब्लॅकआउट अन् आपत्कालीन स्थितीमुळे अनेक गाड्यांच्या वेगावर ब्रेक, पाहा संपूर्ण यादी