Nitesh Rane: मुंबईतील गड किल्ल्यांच्या (Mumbai Fort) संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईतील किल्ल्यांवर असणारी अतिक्रमणं (Encroachments) हटवली जाणार आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत हिंदुत्वयाच्या विषयावर, छत्रपती महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विषयावर तडजोड होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दुसरीकडे महानगरपालिकेच्या रणधुमाळीत माहिम, शिवडी - ब्रांदा - सायन या किल्ल्यांवरील अतिक्रमण (Mumbai Fort Encroachments) हटवण्यासाठी प्रशासनाकडूनही हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. तर भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेने गडकिल्यांचा विषय पेटण्याचीही शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
Mumbai Fort Encroachments : गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी कमिटी स्थापन
भाजपचे मंत्री नितेश राणे यांचा यासंदर्भात माहिती देताना आक्रमक पवित्रा घेतलाय. गड किल्ले (Mumbai Fort) यांच्यावर अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी कमिटी स्थापन केली आहे. सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हि कमेटी तयार झाली आहे. बहुतांश सर्व मंत्री यात आहेत. या कमिटीत मीही सदस्य आहे. गड किल्ले आणि महत्त्वाच्या ठिकाणी हिरवी चादर टाकली जाते, अतिक्रमण केले जातं. इतिहास पुसण्याचे काम काही जिहादी मानसिकतेचे लोक करत आहेत. असे थडगे उभे करायची, हिरवी चादर टाकायची. गड किल्ले जिहादमुक्त करण्याची जबाबदारी आता आमच्याकडे आली असल्याचे मत मंत्री नितेश राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलीय.
Nitesh Rane: अन्यथा अतिक्रमणे आम्ही काढू, आमचे बुलडोझर आमचे JCB ऐकणार नाही
काही ठिकाणी या अतिक्रमणात हत्यारे मिळून आले. तर काही संशयित तिथे गायब झाले आहेत. पण आता हे गडकिल्ले मुक्त होतील. आताच मी सांगतोय तुमची हिरवी चादर काढा, नाहीतर आम्ही काढायला येऊ. आम्ही आमच्या पद्धतीने कार्य करू आणि तुम्हाला न सांगता करू. छत्रपतीं शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी बनवलेल्या ऐतिहासिक किल्ल्यावरील अतिक्रमणे आम्ही काढू. आमचे बुलडोझर आमचे JCB ऐकणार नाही, आमचे तोंडपाठ आहे. आम्ही उद्यापासून ऍक्शन करू. हिंदुत्व विषयावर, छत्रपती महाराजांच्या विषयावर तडजोड होणार नाही. अशी आक्रमक भूमिका मंत्री नितेश राणेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.
आणखी वाचा