Bangladesh Dengue Outbreak : बांगलादेशात डेंग्यूने (Dengue) साथीचे रूप धारण केले आहे. बांगलादेशातील रविवारी सकाळपर्यंत एकूण 2,292 डेंग्यू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. केवळ एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रूग्णांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत डेंग्यूने आणखी नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, या संसर्गामुळे मृतांची संख्या 176 झाली आहे. तर बुधवारी या आजाराने 19 लोक मरण पावले होते. ही भयानक परिस्थिती पाहून आरोग्य तज्ञांनी सांगितले की, सरकारने (Government) अधिकृत घोषणा केलेली नसली तरी देखील हा रोग बांगलादेशात "महामारी" सारखा पसरला आहे.
नवीन रुग्णांपैकी 1,064 रुग्णांना स्थानिक रुग्णालयांमध्ये आणि उर्वरित रुग्णांना बाहेरील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संपूर्ण बांगलादेशात, 7,175 डेंग्यू रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, ज्यात राजधानीतील 4,149 रुग्णांचा समावेश आहे. या वर्षी आतापर्यंत, DGHS मध्ये 32,977 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे आणि 25,626 बरे झाले आहेत.
21 दिवसांत 109 मृत्यू
देशात 2022 मध्ये डेंग्यूमुळे 281 मृत्यू झाले होते. जे 2019 मध्ये नोंदवलेल्या मृत लोकांपेक्षा जास्त प्रमाणात आहेत. याशिवाय गतवर्षी डेंग्यूचे 62423 रुग्ण सापडले होते आणि 61971 बरे झाले होते. गेल्या 21 दिवसांत 109 मृत्यू आणि 20465 पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद झाल्यामुळे जुलै हा बांगलादेशकरता सर्वात भयावह महिना ठरला आहे. एका आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, जानेवारीमध्ये डेंग्यूचे 566 रुग्ण आढळून आले असून त्यातपैकी सहा जणांचे मृत्यू झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये शून्य मृत्यूसह 111 प्रकरणे समोर आली होती तर मार्चमध्ये दोन मृत्यूंसह 143 प्रकरणे आणि एप्रिलमध्ये दोन मृत्यूंसह 50 प्रकरणे, मे महिन्यात 1036 रूग्ण पाॅझिटीव्ह सापडले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यु झाला होता. जूनमध्ये 34 जणांचे मृत्यु होऊन 5,956 प्रकरणे नोंदवली गेली होती.
DGHS डेटानुसार, डेंग्यू पॉझिटिव्ह प्रकरणे आणि मृत्यूच्या आकडेवारीच्या तुलनेत गेल्या वर्षी डेंग्युग्रस्त रूग्णांची संख्या कमी होती. या दरम्यान 268 रुग्णांचा मृत्यू झाला असून 62,382 रुग्णांची नोंद झाली आहे. 2019 मध्ये देशात सर्वाधिक 1,01,354 डेंग्यूचे रुग्ण आणि 179 मृत्यू झाले. एडिस डासांच्या उत्पत्तीसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने अधिक चांगले असतात.यामुळे रुग्णांच्या संख्येत तीव्र वाढ होण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी (Health Expert) व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या