नागपूर : मंकी पॉक्सचा जगभरात फैलाव सुरू आहे. 74 देशांमध्ये मंकी पॉक्सचे 16,836 रुग्ण आढळून आले आहे. त्याची खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने नागपुरातही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये मंकी पॉक्स चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य भारतातील संशयित रुग्णांना येथे तपासणी करून घेता येणार आहे.


कोरोना संक्रमितांचा वाढता ग्राफ चिंता वाढविणारा ठरला असानाच आता मंकी पॉक्सचे संकटही येऊ घातले आहे. मंकी पॉक्सला थोपविण्यासाठी भारतात पूर्वतयारीवर भर देण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत. नागपुरातही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये मंकी पॉक्स चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य भारतातील संशयित रुग्णांना येथे तपासणी करून घेता येणार आहे.


वैद्यकीय आणिबाणी जाहीर


मंकी पॉक्सचे केरळमध्ये 3 तर दिल्लीत 1 असे एकूण देशात 4 रुग्ण आढळूण आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गाला वैद्यकीय आणिबाणी जाहीर केले आहे. सोबतच चाचणी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार भारतात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने एम्सच्या मायक्रोबायोलॉजी विभागाकडे चाचण्यांची जबाबदारी सोपविली आहे. त्यासाठी पीसीआर किट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


वानर, कुत्री, खारच्या माध्यमातूनदेखील मंकी पॉक्सचा फैलाव


मंकीपॉक्स संसर्गातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. संसर्ग झाल्यानंतर त्वचेवर पुरळ येतात. हे फोड हळूहळू हात, खांद्यावर पसरतात. ताप, सूज येते. या फोडांच्या गडद खुणा त्वचेवर राहू शकतात. मंकीपॉक्सबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा फैलाव होतो. हा विषाणू जखमेतून निघून नाक, तोंडावाटे मानवी शरीरात प्रवेश करतो. वानर, कुत्री, खार यांच्या माध्यमातूनदेखील याचा फैलाव होऊ शकतो.  हा दुर्मीळ आजार मानण्यात येतो. सुरुवातीला संक्रमित व्यक्तीला ताप आणि फ्ल्यूसारखी लक्षणे जाणवतात. कांजण्यांसारखी याची लक्षणे आहे. सुरुवातीला ताप, पाठदुखी, सूज, डोकेदुखी सारखी लक्षणे जाणवतात. नंतर शरिरावर पुरळ उठू लागते. याचे विषाणू डोळे, नाक, श्वासांद्वारे इतरांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता असते. हा आजार बरा होणारा असला तरी सगळ्यांनीच याची काळजी घेण्याची गरज वर्तवण्यात येते आहे.


मंकी पॉक्सची लक्षणे


- ताप येणे
- डोकेदुखी
- स्नायू तसेच कंबरेत वेदना
- कंप जाणवतो
- थकवा वाटू लागतो
- अंगावर सूज येते
- संसर्गकाळात त्वचेवर पुरळ येतात


Nagpur Covid Update : रुग्णालयात भरती होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या शंभरीजवळ, सोमवारी फक्त 544 RTPCR चाचण्या