पीआयबीचे महासंचालक आणि केंद्र सरकारचे प्रधान प्रवक्ते फ्रँक नरोन्हा यांनी आपल्या ट्वीटमधून सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ते पत्र बोगस असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्राने या बोगसगिरीची चौकशीही सुरू केली आहे.
या पत्रात राजमुद्रेचाही वापर करण्यात आला असल्यानं याकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. दरम्यान, या बोगस पत्राप्रकरणी सरकारनं पोलिसात तक्रार केली असून सध्या पोलीस याबाबत कसून चौकशी करत आहेत.
हेच ते बोगस पत्र
काय म्हटलं होतं या बोगस पत्रात?
- केंद्र सरकारने आता जमिनीचा सातबारादेखील आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करणार आहे. असं या पत्रात म्हटलं होतं.
-तसेच यासंदर्भात सर्व राज्यांना आदेश देण्यात आले असून, याची लवकरच अंमलबजावणी सुरु होणार आहे. असं या बोगस पत्रात म्हटलं आहे. मात्र, असं कोणतंही पत्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.