Influencer Attacked during During livestream: मेक्सिकोमधून (Mexico) सोशल मीडियाला (Social Media) हादरवणारी घटना समोर आली आहे. सिनालोआ राज्यात एका बंदूकधाऱ्या व्यक्तीने एका सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरची हत्या (Crime) केली आहे. मुख्य म्हणजे लाइव्ह स्ट्रीमदरम्यान, हा सर्व प्रकार घडला.  सीझर गॅस्टेलम असं हत्या करण्यात आलेल्या तरुण इन्फ्ल्युएंसरचे नाव आहे. लॅटिन अमेरिकन देशात सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर्सना (Social Media Influencer) कशा पद्धतीने लक्ष्य केले जाते, याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियात धुमाकूळ उडाला आहे.  

Continues below advertisement

सीझर गॅस्टेलमवर लाइव्ह स्ट्रीमदरम्यान हल्ला, नेमकं घडलं काय? (Influencer Attacked during During livestream video goes viral)

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीझर गॅस्टेलम असे इन्फ्ल्युएंसर तरुणाचे नाव असून, सिनालोआ राज्यातील राजधानी कुलियाकन येथे त्याची हत्या करण्यात आली. मंगळवारी त्याच्यावर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  मेक्सिकोतील अधिकाऱ्यांनी संकेत दिले की,  युवकाची हत्या कार्टेलच्या हिंसाचाराशी संबंधित आहे. परंतु, अद्याप कोणत्याही  विशिष्ट गटाला जबाबदार धरण्यात आलेले नाही. 

तरुणाच्या मृत्यूच्या ठिकाणचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.  केएफसीच्या पार्किंग लॉटमध्ये तरुण इतर दोघांसोबत गप्पा मारताना, हसताना दिसत आहे.  तेव्हा दोन जण मोटारसायकलवरुन येतात. एक व्यक्ती बंदूक काढून सीझर गॅस्टेलमवर धाड धाड गोळ्या झाडतो.  यानंतर हल्लेखोर दोघेही घटनास्थळावरुन पलायन करतात. हा हल्ला वर्दळीच्या ठिकाणी करण्यात आला असल्याची माहिती आहे.  

Continues below advertisement

सीझर गॅस्टेलमसोबत नेमकं काय घडलं? घटनास्थळावरील व्हिडीओ व्हायरल (Mexican Influencer Cesar Gastelum Attacked)

आतापर्यंतच्या तपासात असे आढळून आले की, सीझर गॅस्टेलमने आधी काही व्हिडीओ प्रसिद्ध केले होते. ज्यात त्याने एका गुन्हेगारी गटाचा उल्लेख केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  मेक्सिकोच्या राष्ट्रध्यक्ष क्लाउडिया शिनबाम यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं सांगितलं. सीझर गॅस्टेलमचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. टिकटॉकवर त्याचे 6,50,000हून अधिक फॉलोअर्स आहेत.  इतर सोशल मीडिया साइट्सवरही त्याचे चांगले फॉलोअर्स आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Jan Nayagan Ott release: विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?