Thalapathy Vijays Jan Nayagan Ott: तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आणि तामिळ सिनेमाचे सुपरस्टार जोसेप विजय अर्थात विजय थलपती (Vijay Thalapathy) यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांचा अलिकडेच 'जन नायगन' (Jana Nayagan) हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'जन नायगन' हा सिनेमा आता लवकरच ओटीटीवर (OTT Platform) रिलीज होणार आहे. 'जन नायगन' हा सिनमा 23 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. आता ज्यांना हा सिनेमा चित्रपटगृहात (Entertainment) जाऊन पाहता आला नाही, त्यांना हा सिनेमा आता घरबसल्या पाहता येईल. पण हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार? पाहूयात.
थलपती विजय यांच्या सिने कारकिर्दीतील हा शेवटचा सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. 'जन नायगन' या सिनेमाने 14 दिवसांत वर्ल्डवाईड 306.31 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमागृहातील प्रेक्षकांची घटती संख्या पाहता, फिल्ममेकर्सने या सिनेमाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
'जन नायगन' हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? (Thalapathy Vijays Jan Nayagan Ott release date out)
'जन नायगन' हा सिनेमा खरंतर 8 जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज होणार होती. परंतु, सेंसर बोर्डसोबत झालेल्या वादामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला. हा सिनेमा पोस्टपोन करण्यात आला. या सिनेमाच्या संबंधित केस उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. दरम्यान, मेकर्सने केस मागे घेतली. या सिनेमाला पहिला मोठा झटका तेव्हा बसला, जेव्हा हा सिनेमा एप्रिल महिन्यात ऑनलाइन लीक झाली.
'जन नायगन' या सिनेमाला सुरुवातीला उत्तम प्रतिसाद मिळाला. पण हळूहळू या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. हा पॉलिटिकल अॅक्शन ड्रामा फिल्म या महिन्याच्या अखेर, म्हणजेच 21 ऑगस्ट 2026 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आङे. हा सिनेमा झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची माहिती आहे. एच. विनोद दिग्दर्शित आणि थलपती विजय अभिनीत 'जन नायगन' हा सिनेमा 500 कोटी रुपये या बजेटमध्ये तयार करण्यात आला. 'जन नायगन' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करू शकलेला नाही. पाला बजेट वसूल करू शकलेला नाही. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सिनेमाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
