Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील (Marathawada Flood) शेतकऱ्यांना बसला असून हातातोंडाशी आलेलं उभं पीक जमीनदोस्त झालं आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराज्याला (Farmers) आता आर्थिक मदतीची गरज आहे. सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आता शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठीच्या पुराव्यांचे संकट भेडसावत आहे. तर नुकसान भरपाईची रक्कम मिळविण्यासाठी पंचनामा केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने बँकेत जाऊन 'केवायसी' करून ओळख पटवून देणे आवश्यक आहे. अशी माहिती छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. तर बँकांच्या पडताळणीनंतरच शेतक ऱ्यांना मदत देण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहे.
बँकेत जाऊन 'केवायसी' करून ओळख पटवून देणे आवश्यक (Marathawada Flood)
राज्यासह मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. तर पुरामुळे संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आहे. तरी ही रक्कम मिळविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने बँकेत जाऊन 'केवायसी' करून ओळख पटवून देणे आवश्यक असल्याची माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. तर पंचनामा केल्यानंतर रक्कम मिळवण्यासाठी 'केवायसी' करणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
Marathwada Flood Crop Loss : महापुरानंतर कशी घ्याल पिकांची काळजी?
पाऊस ओसरल्यानंतर शेतात पाणी साचले आहे. यामुळे पिकांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे. यावर नवीन बुरशीनाशके फवारणे आवश्यक आहे. बांधबंदीची दुरुस्ती करणे आणि नवीन खतांचा वापर करून शेती पूर्ववत आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. खूप जास्त पाण्याच्या प्रवाहामुळे मातीसह पिके वाहून गेली आहेत. ज्या ठिकाणी सोयाबीन आणि उशिरा पेरलेल्या कापसासारख्या पिकांना वाचवता येईल, त्या पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. कापसातील बीट राहिलेले बोंड पिकींग करता येतील. बाजारात उपलब्ध असलेले Roko fungicide फवारणीसाठी वापरले जाऊ शकते. "जे पीक लोरलंय त्या पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला गेलं असं समजण्यात काही हरकत नाही." याचा अर्थ पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या पिकांबद्दल आशा सोडून, वाचलेल्या पिकांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. शेतीत साचलेले पाणी काढून टाकणे हे पहिले पाऊल आहे.
आणखी वाचा