Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे महाराष्ट्रभर दौरा करत आहे. आज नाशिक (Nashik) जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आले असता त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आम्ही पाडणार आहे. यांनी आम्हाला फसवलंय, असा निर्धारच मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगळे जण सारखेच आहेत. तिघांनी बनून षड्यंत्र केलंय. किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहात. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आणि आताही महायुतीच्या सरकारने तेच केले आहे. या दोघांना निवडणुकीत पाडा, असे मनोज जरांगे पाटलांनी म्हंटले आहे.
...तर विधान सभेला उमेदवार देणार
ते पुढे म्हणाले की, मराठ्यांनो निवडणुकीला उभ राहण्यापेक्षा यांना पाडा. यांना पाडण्यात सुद्धा विजय आहे, मला समाजाव्यतिरिक्त बाकी काहीही कळत नाही. 6 जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला उमेदवार देणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
निवडणुकीचे दोन महिने म्हणजे यांचा पोळा
लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे म्हणाले की, हे दोन महिने म्हणजे यांचा पोळा आहे. यांच्यात विनाकारण जाऊ नका, फक्त मजा बघा.मराठा समाज वेळेला करेक्ट कार्यक्रम करणार आहे. टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
जरांगेंची भुजबळांवर जोरदार टीका
निवडणुकीला उभे राहणं हा छगन भुजबळ यांचा धंदा आहे. स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे. आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या आहेत. भुजबळ आणखी किती दिवस खोटं बोलणार आहेत. तुम्ही विरोध करत राहा, मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊनच दाखवणार, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिला आहे. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावरून ओपनच्या मतदारसंघात हे निवडणूक का लढवतात? असा सवाल मनोज जरांगेंनी भुजबळांना विचारला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
'तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 पाडू', ओबीसी नेत्याची मनोज जरांगे पाटलांना वॉर्निंग!