Maratha Reservation बीड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केलाय. ते सध्या मुंबई मोर्चाच्या अनुषंगाने मराठा बांधवाशी संवाद साधत आहेत.
अशातच, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मुंबईकडे कूच करण्यापूर्वी आज (24 ऑगस्ट ) बीडमध्ये अंतिम निर्णायक सभेचं आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा (Manjarsumbha) येथे ही सभा होणार आहे. आजच्या सभेतून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सरकारला काय इशारा देणार? याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या दरम्यान मराठा आरक्षणाच्या पुढील दिशेबाबत महत्त्वाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीची कार्यकक्षा कशी असणार?
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलंय. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची निवड करण्यात आली. याआधी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपसमितीचे अध्यक्ष होते. मंत्रिमंडळ उपसमितीची कार्यकक्षा कशी असणार? हे जाणून घेऊ.
-मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते.
-मराठा आरक्षणाविषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवण्यात येणार
-न्यायप्रविष्ठ प्रकरणांमधील शासनाच्या वतीनं बाजून मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवण्यात येणार, सोबतच विशेष समुपदेशींना सूचना दिल्या जाणार
-न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती ठरविले जाणार
-न्या. संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय ठेवणे
-मराठा आंदोलन आणि त्यांचे शिष्टमंडळाशी चर्चा करणे
-जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणे
-मराठा समाजासाठी केलेल्या योजना तसेच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे
आणखी वाचा