Horoscope Today 24 August 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 24 ऑगस्ट 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कारण आजपासून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना पवित्र मानला जातो. तसेच, ग्रहांच्या दृष्टीने देखील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण नुकताच षडाष्टक योग निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

बाजारातील चढ-उतारांकडे बारकाईने लक्ष द्या पैशाची अति हाव ठेवू नका व तुमचा धोका वाढवू नका. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

विद्यार्थ्यांनी अभ्यासाची पद्धत न बदलता पूर्वी करत होता त्याच पद्धतीने अभ्यास करावा.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

महिला प्रेमळ पणाने सर्वांची विचारपूस करतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या यश मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

शैक्षणिक सहली करण्याचे योग येतील उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

प्रकृती स्वास्थ्य सांभाळावे लागेल एचडी कमी होणे रक्तामध्ये दोष उत्पन्न होणे हे विकार संभवतात.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला हवे तसे वातावरण न लागल्यामुळे कामात मन लागणार नाही.  

तूळ रास (Libra Horoscope Today)

उच्च अभिरुची आणि सौंदर्याची उपजत जाण असल्यामुळे परिस्थिती बदलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल.   

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

महिलांनी तब्येतीकडे लक्ष द्यावे अनेक गुप्त शत्रू निर्माण होऊ शकतात.  

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

व्यवसायात मशिनरीशी जरा जास्त संबंध आल्यामुळे सावधानता बाळगलेली बरी.    

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरीमध्ये नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही परंतु तुमच्या भौतिक गोष्टींवर वरिष्ठ खूश होतील.           

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज काही गोष्टी आपसुकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खुश होऊन जाईल.  

मीन रास (Pisces Horoscope Today)

तरुणांना स्वतःच्या जोडीदार स्वतः शोधण्यात जास्त आनंद वाटेल आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळेल.

हेही वाचा :

Shani Amavasya 2025 : शनि अमावस्येनंतर 'या' 3 राशींचं नशीब रातोरात बदलणार; शनि महाराजांच्या आशीर्वादाने मिळणार कर्माचं फळ