Marathi Celebrity On Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत आहेत. आज त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आठवा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती खालावत असल्याने राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हेमंत ढोमेसह (Hemant Dhome) अनेक सेलिब्रिटींनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाबाबात पोस्ट शेअर केल्या आहेत. 


अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट (Riteish Deshmukh Tweet) केलं आहे की,"जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो".






किरण माने (Kiran Mane) साताऱ्यातील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं. कारण व्सवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणाऱ्या व्यवस्थेला तो धाक दाखवण्याचं महान कार्य तुम्ही करत आहात. तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे". 



"आता नाही तर कधीच नाही" : अश्विनी महांगडे


'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेदेखील (Ashvini Mahangade) वाई येथील साखळी उरोषणात सहभागी झाली होती. तेथील व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"आता नाही तर कधीच नाही.. विद्यार्थी ...स्वप्नं...मेहनत...परीक्षा...उत्तीर्ण....यश...तरीही अपयश...मग आक्रोश... यातना...मग परत परीक्षा....मग परत सगळे तेच आधीचे पाढे...आणि मग आत्महत्या....
हे गेले किती तरी वर्ष सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही यासाठी उभे राहायला हवे.
या लढ्यात मी भाग होणे हे माझे कर्तव्य आहे".


"मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे" : हेमंत ढोमे


अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) ट्वीट केलं आहे,"आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय..
मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत! शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!".






एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?; केतकी चितळेचा सवाल


अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) बसच्या तोजफोडीचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? इंडियाला UCC हवा असेल, पण भारताला Uniform Criminal Law ची गरज आहे. सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकुन तो दगड चालकाला लागला असता तर?". 



संबंधित बातम्या


Manoj Jarange : "मराठ्यांना हक्काचं आरक्षण हवंय", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य