Mahendra Dalvi on Sunil Tatkare : सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना दिल्लीत पाठविण्यासाठी आम्ही मतभेद बाजूला ठेवले आणि नरेंद्र मोदींना  तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी काम केलं. मात्र सुनील तटकरे यांनी आम्हाला लोकसभेला निवडून आल्यानंतर फसवलं असा घणाघात अलिबागचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi )  यांनी केला आहे. कर्जत मधील राष्ट्रवादीच्या उबाठा युतीवरुन दळवींनी तटकरे यांना इशारा देत तिथे आमचा महेंद्र थोरवे एकटा काफी असल्याचं म्हटलंय. रायगडमधील दोन्ही महेंद्र हे इतिहासात भक्कम असल्याचं म्हणत त्यांनी थेट राष्ट्रवादीला आवाहन दिले आहे. 

Continues below advertisement

सुनील तटकरे यांच आता वय झाल आहे

सुनील तटकरे यांच आता वय झाल आहे असेही दळवी म्हणाले. यावेळी दळवींनी तटकरे यांचा खरपसून समाचार घेतलाय. मुरुड मधील एका अलिबाग मध्ये एका कार्यक्रम प्रसंगी त्यांनी ही वक्तव्य केलेत. दरम्यान, गेल्या आठवड्यातच दळवी यांनी तटकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्यावर टीका केली आहे. तटकरे यांचा हा फसवणुकीचा धंदा आहे. त्यांनी गेल्या अनेक निवडणुकांत आमच्या पाठीमागे उभं राहून नेहमी गियर बदलला आणि आमच्याशी विश्वासघात केला. नगरपालिकेचे सर्व रेकॉर्ड, निधीचे विवेचन आमच्याकडे आहे. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही प्रत्येक मुद्द्याचा हिशोब मांडणार आहोत,” असा इशारा त्यांनी दिला होता. 

 

Continues below advertisement