Uttam Jankar : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजप मतचोरी करुन सत्तेत येईल अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे. कालच मत चोरीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा झाला. त्यानंतर आमदार जानकर यांनी हा दावा केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जानकर यांनी भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. 

Continues below advertisement

बिहार विधानसभा निवडणुकीत 70 टक्के मतदान विरोधी पक्षांना पडूनही भाजप सत्तेवर येणार

बिहार विधानसभा निवडणुकीत 70 टक्के मतदान विरोधी पक्षांना पडूनही भाजप सत्तेवर आलेले दिसेल असे गणितही आमदार जानकर यांनी मांडले आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्षाला राजदची मते वळवली जातील. तेज प्रताप यादव यांना सुद्धा राजद आणि काँग्रेसची काही मते वळवली जातील. अशी 35 टक्के मते वळवली जातील. उरलेल्या 65 टक्के मतात राजदला 35 टक्के आणि भाजपला 30 टक्के मतदान दाखवले जाईल. राजदचे 50 उमेदवार एक लाखाच्या फरकाने निवडून आणले जातील. भाजप मात्र आपले उमेदवार 10 ते 20 हजाराच्या फरकाने निवडून आणेल असे जानकर म्हणाले. यातून भाजप सत्तेच गणित जुळवत 110 ते 115 जागा पर्यंत पुढे जाईल. देशापुढे असे चित्र तयार केले जाईल. 70 टक्के मते विरोधात पडली  तरी 30 टक्के मते घेऊन भाजप सत्तेत आलेला दिसेल असे भाकित ही जानकर यांनी केले  आहे. 

जानकरांनी व्यक्त केली पुन्हा एकदा मतचोरी होण्याची शक्यता 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान होण्या पूर्वीच आमदार जानकर यांनी भाजप कशा पद्धतीने सत्तेत येईल याचे गणित मांडले आहे. आमदार जानकर यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा मतचोरी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल, व एनडीएतील त्यांचे मित्रपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल व त्यांच्या महागठबंधनमधील मित्रपक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. निती कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर हे बिहारच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. प्रचार करत आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देील भाजपसह एनडीएच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

वोट चोरी करुन डोक्यावर बसलेत, सत्याच्या लढ्यात आमच्यावर गुन्हे दाखल होणार, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल